![]()
शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला सेफ्टी गेट नसल्यामुळे आणि शाळेतील लहान-लहान मुले ऑटोमध्ये निट बसत नसल्यामुळे येता-जाता अनेकदा लहान-मोठ्या दुर्घटना होतांना दिसत आहेत, मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला सेफ्टी गेट अनिवार्य केल्यास समोर होणाऱ्या दुर्घटनेला आपण नक्कीच आळा घालू शकतो.
या करीता प्रा. निलेश रमेश बेलखेडे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली विभागीय सचिव, पूर्व विदर्भ युवासेना, (म.रा.) यांचा मार्गदर्शनाखाली युवासेना कॉलेज कक्ष चंद्रपुर तर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर (RTO) यांना दिले निवेदन.
यावेळी शिवसेना- युवासेना कॉलेज कक्षाचे आदर्श लाडस्कर यांच्यासह सार्थक शिर्के, आदर्श खडसे,हर्षल खनके व रोहन आबंटकर यांची उपस्तिथी होती


