Home Breaking News माहेश्वरी गिरडे यांची जागतिक उद्योजकता परिषदेकरिता निवड.!

माहेश्वरी गिरडे यांची जागतिक उद्योजकता परिषदेकरिता निवड.!

0
55

सुरेश भगत

समुद्रपुर शहर प्रतिनिधी

समुद्रपूर:  समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या माहेश्वरी गिरडे यांनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरले आहे. *ग्लोबल एंटरप्रेन्युअरशिप कॉन्क्लेव्ह 2025* मध्ये त्यांची निवड झाली असून, हा कार्यक्रम 10 आणि 11 जानेवारी 2025 रोजी पुण्यातील 5-स्टार *हॉटेल orchid* येथे होणार आहे.

या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे 30 हून अधिक देशांतील नामांकित उद्योजक, हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक, तसेच जागतिक स्तरावरील दिग्गज व्यक्तिमत्त्वे यात मार्गदर्शन करणार आहेत. माहेश्वरीचे नेतृत्व आणि उद्योजकतेतील दृष्टीकोन या यशाचे मुख्य घटक ठरले आहेत. नामवंत उद्योजकांसाठी असणाऱ्या या व्यासपीठावर आपल नाव कोरण्याच काम या शेतकरी कन्येने अगदी लहान वयात केले आहे.

माहेश्वरी सध्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असून, त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी आपले विचार या व्यासपीठावर सादर केले आहेत. त्यांच्या नेतृत्वकौशल्य आणि *मुलाखतीतील प्रभावी सादरीकरणामुळे* त्यांना या परिषदेकरिता निवड मिळाली आहे.

या परिषदेतील प्रमुख मार्गदर्शकांमध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर, ललित शिंदे (सिंगापूर), अश्विनी कक्कर (ऑक्सफर्ड), डॉ. विजय जोशी (यूके), चक्र गांधी (युएसए), आणि मार्टिन मेयर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

माहेश्वरी गिराडे यांनी केलेली प्रगती आणि त्यांचे यश गावासाठी प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी नवीन दिशा देणारे ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here