मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
दिनांक 9/4/2025रोजी 1987 ते 1992 या कालखंडात विकास विद्यालय गिरड येथे शिकणाऱ्या माजी विद्यार्थिनी गुरुकुल विद्या निकेतन गिरड येथे माधुरी दांडेकर या बाल मैत्रिणीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
![]()
त्यात चिंडवाडा नागपूर आर्वी वर्धा बेला हिंगणघाट व गिरड परिसरातील बालमित्र सहित 50 ते 60 वर्ग मित्रांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून तब्बल 32 वर्षानी एकमेकांना भेटताच जुन्या आठवणींना वाट मोकळी करून देताच आठवणीना बहर आला सगळ्यांनी हर्ष उल्हासात आपली बाल मैत्रीण माधुरी दांडेकर हिचा जन्मदिवस केक कापून मवत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला व सामाजिक कार्यकर्ते बहादुर सिंह अकाली यांच्या अध्यक्षतेत स्नेह मिलनाचा कार्यक्रम पार पडला अकाली यांनी आपल्या समारोपिय भाषणाची सुरुवात अत्यंत मिश्किल पणे करताच जमलेल्या वर्गमित्रांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आणि त्यांनी बालपणीच्या आठवणी ना उजाळा दिला बालमित्रांना घेतलेले चिमटे सगळ्यांना पोट धरून हसवत होते शेवटी बाल मैत्री ही निस्वार्थ प्रेमाचा झरा आहे ही अशीच टिकवावं एकमेकांना आदर करत स्नेह जिव्हाळा प्रेम कायम ठेवत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपली मैत्री जपाव कायम ठेवा असे आव्हान अकाली आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त करीत होते उपस्थित आमचे आभार बर्थ डे गर्ल माधुरी दांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक जयंत मोटघरे मोहन दाबणे जितू किंकर मुकुंदा मोडघरे हमीद पटेल शरद बाकडे बळवंत गाठे आदींनी सहकार्य केले.


