मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
सत्यमेव जयते फार्मर कप2024 अंतर्गत समुद्रपूर तालुक्यातील मांडगावंच्या कलश उत्पादक गटाला प्रथम पुरस्कार प्राप्त केला
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित करण्यात आले
तालुक्यातील मांडगाव प्रभागातील कलश उत्पादक समूहाने सामूहिक शेती करण्याचे ठरविले सर्वात प्रथम शुभांगी झोरे यांनी या गटाला शेती करण्याकरिता पाणी फाउंडेशन मार्फत प्रशिक्षण घेण्या करिता तालुकास्तरीय तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष माननीय निशा मेश्राम यांना या गटातील महिलांचे नावे दिले व महिलांना प्रशिक्षण घेण्यास पाठविले प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर या गटाची मीटिंग लावून या गटाला माननीय लतिका करडे यांनी मार्गदर्शन केले नंतर समानता प्रभाग संघामार्फत प्रभाग समन्वयक गजानन चतुर प्रभागाचे अध्यक्ष हीवंज सचिव किरपाल कोषाध्यक्ष धोंगडी कविता झाडे मंगेश वाघमारे यांनी या गटाला सहकार्य केले या गटाने सामूहिक शेतीची सुरुवात सत्यमेव जयते फार्मर या प्रतियोगितेत भाग घेऊन शेतीला सुरुवात केली एका वर्षात सर्व महिलांनी ऐकत्र 14 शॉप वेळेनुसार पूर्ण केल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देऊन समूहात उतार चढाव येत असून सुद्धा याच माध्यमातून भारती गट स्थापन झाला10ऐकर शेती सेंद्रिय पद्धतीनुसार केली यांना ही प्रतियोगिता राबविताना पाणी फाउंडेशन चे अतुल आंबुलकर ,राम अंभोरे, कॉम सेंटरच्या तपस्वीताई यांनी मार्गदर्शन केले तसेच तालुकास्तरीय निशा मेश्राम ,दिनेश आरसे जगदीश शेंन्डे रितेश जांभुळकर यांनी पाहणी केली भारती समूहाने14 शॉप पूर्ण करून90पैकी 88 घेऊन या गटाला मिळाले सत्यमेव जयते फार्मर कप2024 मार्फत समुद्रपूर तालुक्यातील प्रथम पुरस्काराकरिता हा गट विजयी ठरला भारती गटाला23मार्च 2025 ला पुणे इथे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ॲक्टर आमिर खान किरण राव अविनाश पोळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले गटातील महिला शुभांगी चांभारे रवीना बावणे लिलाबाई डांगरी शकुंतला बावणे मालिनी कांबळे वर्ष बोरकर सुमित्रा बावणे अर्चना लाडेकर शोभा मोहिते उमा दांडेकर कुसुम मसराम यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले समूहातील सदस्यांना तालुका स्तरावरून शुभेच्छा व अभिनंदन मिळत आहे


