Home Breaking News समुद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.!

समुद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.!

0
70

 

 

राजु कांबळे

समुद्रपुर

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपूर. वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपुर येथे आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी महामानव, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर ( King of knowledge) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

समुद्रपुर येथील डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला समुद्रपूर नगराध्यक्षा वैशालीताई तुळनकर यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले तर ध्वजारोहण महांतारे यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन रुग्ण वाहीनी अँब्युलन्स चे लोकार्पण नगर पंचायत सी.ओ. पौर्णिमा डावित मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी डॉ. खुजे साहेब,महांतरे, महाकाळे सर,अमित वासनिक,राजु गणवीर, सुरेश भगत,चंद्रशेखर हातेकर, राहुल लोहकरे, राजु कांबळे, भोला शंकर, अमोल शंभरकर,गुणवंत कोटेकर,केशव तेलंग, गजू ,रवी लडी, श्रीकांत पानेकर, अंबागडे,प्रशांत तुपे, नितीन बाराहाते, प्रफुल कांबळे, महिला मंडळ,बौद्ध बांधव व समुद्रपूर चे समस्त नागरिक बंधू उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे हार्रापण,पंचशील ध्वजारोहण करून व बुद्ध वंदना, भारताचे संविधान उद्देशिका वाचन घेण्यात आली. बुद्ध गीत, भीम गीत सादर करण्यात आली आणि नंतर बाईक रॅली काढून अल्पोहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here