माहूर गडावरील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या माहूर येथील बाबा सोनापीर यांच्या उरसाला सुरुवात..! हजारोच्या संख्येने भाविक दाखल.! 

0
11

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

 

श्रीक्षेत्र माहूर : माहूर गडावरील सरकार सोनापीर बाबा उर्फ हजरत सय्यद सनाऊल्लाह शहा आणि बाबा लंगोटबंद उर्फ हजरत सय्यद हबीबउल्लाह शाह रहेमतुल्ला आलेह यांच्या उरुसाला मोठ्या भक्ती भावात दि 5 रोजी पासून सुरुवात झाली असून दि 5 रोजी सायंकाळी मुजावर बाबर फकीर मोहम्मद आणि सज्जादा-नशिन साजिद उल्लाह जागीरदार आणि व्यवस्थापक समिती कडून मनाचा दरबारी शाही संदल चढवून मोठ्या भक्ती भावात सर्वधर्मीय बांधवांच्या उपस्थितीत उरुसाला सुरुवात करण्यात आली.

अनादी काळापासून बाबा सोनापीर दर्गाह सर्व धर्मीय नागरिकांचे श्रद्धास्थान आहे गेल्या 56 वर्षापासून बाबा सोनापीर दर्गाह येथे उरुसाचे आयोजन केले जाते या उरुसात सर्व प्रकारची दुकाने प्रसाद फुल लहान मुलांना खेळण्याचे साहित्य झुले मौत का कुवा कपडे पादत्राणे अत्तर मिनाबाजार तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात सजविण्यात आलेली आहेत दि 5 रोजी सायंकाळी पाच वाजता परचम कुशाई आणि आठ वाजता नंतर दरबारी शाही संदल ने सुरुवात करण्यात आली दि 6 रोजी धार्मिक कार्यक्रम तर दि 7 रोजी हजरत मौलाना हसन रजा यांच्या उपस्थितीत फातेहा खानीचा कार्यक्रम होणार आहे दि 8 रोजी पुन्हा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि 9 दररोज प्रमाणे शहरी इफ्तार सह धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेततर आनंद बेले यांच्याकडून मनोरंजनाची भरपूर साधने उभारण्यात आलेली आहेत दरवर्षीप्रमाणे शहरातून मिरवणुकी द्वारे निघणारा शाही संदलचा कार्यक्रम रमजान महिना असल्याने रद्द करण्यात आला आहे.

उरसात सर्व धर्मीय बांधवांनी दर्शन तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मुजावर बाबर फकीर मोहम्मद सज्जादा नशिन साजिद उल्लाह जागिरदार तसेच प्रकाशक वसंत कपाटे विजय आमले मनोज कीर्तने अकबर भाई अब्दुल जब्बार बावाणी सय्यद हारून भाई यांचे सह व्यवस्थापक मंडळांनी केले आहे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा प्रमुख तहसीलदार किशोर यादव यांच्या यांचे उपस्थितीत मुख्याधिकारी विवेक कांदे नगराध्यक्ष फिरोज दोसानी सपोनी शिवप्रकाश मुळे मराविमचे अभियंता आर बी शेंडे यांचे पोलीस विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाविकांना सेवा सुरक्षा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here