सय्यद इसा
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड.
२ मार्च रोजी पोलीस स्टेशन दराटी चे कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर सहायक पोलीस निरीक्षक श्री योगेश रामचंद्र वाघमारे साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी व सोशल मिडीयाचा वापर, पोलीस भरती संबंधी संपूर्ण तयारी, महिलांचे लैंगीक अत्याचार व संरक्षण, नवीन बदलेले कायदे, पोलीस दलात भरती होण्याचे फायदे या-सर्व विषयासंबंधी सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थीना केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री रवी जाधव साहेब पो. स्टे. दराटी आनंद मेढे सर (आदिवासी विकास निरीक्षक आधीकारी) संतोष पाटील सर (संचालक पाटील अकेडमी किनवट) हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जाधव अँकेडमीचे संचालक श्री अकुंश जाधव सर यांनी खुप परिश्रम घेतले या कार्यक्रमाला सर्व-विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री चाँद पठाण सर यांनी केले आभार प्रदर्शन जाधव सरांनी केले.