मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
समुद्रपूर दि.४ फेब्रुवारी:- अंगणवाडी केंद्र परसोडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना समुद्रपूर सीडीपीओ भोयर मॅडम पर्यवेक्षिका जोशना चव्हाण पर्यवेक्षिका ठमके मॅडम पर्यवेक्षिका कन्नाके मॅडम सरपंच प्रियंका धोटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले च्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका व गावातील महिला उपस्थित होत्या सर्वांना हळदीकुंकू लावून वान वाटप करण्यात आले व सर्वांनी उखाणे घेतले कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका छायाताई गाठे यांनी केले तर आभार मालाबाई कुत्तरमारे यांनी केले वायगाव गोंड बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका व परसोडी येथील सर्व महिला उपस्थित होत्या