पुन्हा एकदा फरीदपूर शिवारामध्ये वाघाने केली गाईची शिकार.

0
17

मनवर शेख 

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

समुद्रपूर तालुक्यातील गिरड फरीदपूर शिवारामध्ये दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी आर्वी फरीदपूर शिवारामध्ये चाळीस हजार रुपये किमतीच्या गायीची वाघाने शिकार केल्याची घटना उघडकीस आली ही माहिती मिळताच तात्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली. व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला व पशुवैद्यकीय अधिकारी यांना प्राचारण करून पोस्टमार्टम करण्यात आले व ही गाय वाघाने शिकार केले ही निष्पन्न झाले. अशी माहिती आमच्या प्रतिनिधीला सूत्रांकडून मिळाली. सलग दोन महिन्यापासून गिरड खुरसापार धोंडगाव अंतरगाव पाईकमारी शिवणफळ उंदीरगाव या गावांमध्ये गाई वासरांच्या शिकारी वाघाने केल्याच्या घटना घडल्या असून वनविभागाचे कर्मचारी सतत ट्रॅप कॅमेरे लावून व रात्र व रात्री पेट्रोलिंग करून वाघाची लोकेशन घेत आहे मागील एक आठवडा पूर्वी वाघीण आपल्या दोन बछड्याला घेऊन रोड ओलांडत असताना अचानक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वाघिणीच्या बछड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती यातच आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 ला फरीदपूर . आर्वी. शिवारामध्ये एका चाळीस हजार रुपये किमतीच्या गाईची शिकार केल्याची घटना घडली असून सध्या या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांचे कापूस वेचानि व चना कापणीचे कामे सुरू असताना मजूर वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी याकडे वनविभागाने गांभीर्याने घेत असून वन विभागाने या संपूर्ण गावामध्ये सतर्कतेचा इशारा म्हणून पोस्टर लावले आहे तरी शेतकरी व मजूर वर्गांनी शेतात जाता वेळेस सतर्कतेने जावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here