सय्यद इसा
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड.
माहूर – करंजी येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख नामदेव राठोड सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा वाई बाजार येथे दिनांक ३१जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना पुढील भविष्यासाठी व समाजकार्यासाठी अनमोल अशा शुभेच्छा अनेकांनी दिल्या. यावेळी त्यांचा सहपत्नीक आमदार भीमरावजी केराम यांचे प्रतिनिधी म्हणून अनिल वाघमारे प्राचार्य राजेंद्र केशवे नंदू कोलपवार,दत्ता शेरेकर यांनी शाल श्रीफळ व श्री दत्तात्रय महाराजांची प्रतिमा भेट देऊन केला.तसेच शिक्षक संघटनेच्या वतीने नामदेव राठोड यांचा सहपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य राजेंद्र केशवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे,माजी जि.प. सभापती संजय राठोड,जि. प.यवतमाळ माजी सदस्य अशोक जाधव,माहूर न.पं.नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, ना.जी.म.स.बँक संचालक दिनकर दहिफळे,माजी पं.स.सदस्य किसन राठोड,उपसभापती
अनिल रुणवाल,माजी सभापती शरद राठोड,पो.उ.नि.विजय चव्हाण,भाजपाचे सामाजिक कार्यकर्तेअनिल वाघमारे, रा.काँ.तालुका अध्यक्ष मेघराज जाधव,डॉ.बाबाराव डाखोरे,प्रल्हाद गावंडे,दत्ता शेरेकर, माजी उपसभापती उमेश जाधव,यश खराटे,नीलधारी जाधव,सुशिल जाधव,नामदेव जाधव,विनय राठोड, विठ्ठल आचणे नरेंद्र जाधव,अनिल महामुने,राजू मुधोळकर(शिक्षण विस्तार अधिकारी) पप्पुलवाड केंद्रप्रमुख हे होते. त्यांच्या छत्तीस वर्षाच्या सेवा कार्याच्या कामाचा गौरव आपल्या मनोगतातून ज्योतिबा दादा खराटे, किसन राठोड,डॉ.बाबाराव डाखोरे,राजेंद्र चारोडे,अनिल महामुने व अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी केला.यावेळी किनवट,माहूर तालुक्यातील,तसेच यवतमाळ जिल्ह्यातील त्यांचे चाहते शिक्षक व राजकीय पदाधिकारी तथा नातेवाईक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.सूत्रसंचालन अरविंद जाधव प्रास्ताविक संजय खडकेकर तर आभार प्रदर्शन शेषराव पाटील यांनी केले.