मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
समुद्रपूर दिनांक२६.जाने:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ला येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र जी चनोडे मुख्याध्यापक किशोर जी पिंपळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कुर्ला येथील सरपंच प्रियंका ताई धोटे उपसरपंच डोळसकर ग्रामपंचायत सचिव जयंत ठाकरे साहेब ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ज्योतीताई कांबळे माजी उपसभापती. नथ्थुजी बोबडे, रूपालीताई कोकाटे, अर्चनाताई पुसनाके, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रशांतजी तिरपुडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश भाऊ धोटे, सहाय्यक शिक्षक उमेश जी मेश्राम सर अंगणवाडी सेविका ताराबाई डेहणे रोजगार सेवक अमर कांबळे तसेच गावातील नागरिक युवा वर्ग यांचा सहभाग होता कार्यक्रमाला गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला.