तहसील कार्यालयातच भरविला निराधारांचा दरबार दबंग तहसीलदार किशोर यादव यांनी एका छताखाली केला निराधारांच्या सर्व समस्यांचा निपटारा.!

0
78

सय्यद ईसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

 

श्रीक्षेत्र माहूर:- माहूर तालुक्यातील इंदिरा गांधी योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना सह निराधार विधवा अपंग महिलां पुरुषांना सेतू केंद्रासह इतर ठिकाणी चकरा माराव्या लागू नये म्हणून तहसील कार्यालयातच बोलावून येथे थंड पाण्याची व्यवस्था करत त्यांच्या सर्व समस्यांचा निपटारा दिनांक 30 रोजी करत कागदपत्रांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी येथे बैठे पथकाची निर्मिती करून सर्व समस्यांचा निपटारा एकाच छताखाली केला गेल्याने सर्व आलेल्या शेकडो निराधारंनी तहसीलदार किशोर यादव यांना यांचे अभिनंदन केले आहे.

 

धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले तहसीलदार किशोर यादव यांनी तालुक्यातील निराधार यांना अनेक वेळा आव्हान करूनही त्यांच्या अडचणीमुळे तसेच सेतू सेवा केंद्र आणि इतर कारणामुळे त्यांना आपली केवायसी हयात प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी विलंब होत होता त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आवाहन करत दि 30 रोजी एकाच छता खाली सर्व समस्यांचा निपटारा करण्यात येईल असे सांगितले होते त्यामुळे त्यांनी सर्व निराधार व्यक्तींनी तहसील कार्यालयात यावे असे आवाहन केले होते त्यामुळे सर्व निराधार अपंग वृद्धांनी तहसील कार्यालयात धाव घेतली होती.

 

तहसीलदार किशोर यादव यांच्याकडून सर्व आलेल्या निराधारांणा थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड उदय वानखेडे वैभव पांढरे रवी गुरनुले यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांनी निराधारांच्या समस्या जाणून घेत निराकरण केल्याने आलेल्या सर्व निराधारानी तहसीलदार किशोर यादव यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here