राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर.
शिक्षणा सोबतच सुप्त गुणांच्या सोबतीने जीवनात प्रगतीची घेऊ शकतो झेप..! ठाणेदार- संदीप गाडे.
समुद्रपुर. : समुद्रपूर तालुक्यातील स्थानिक गिरड येथील विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये खेळ व सांस्कृतिक महोत्सवाचे कार्यक्रम मोठ्या थाठात, उत्साहात पार पडले.
या सांस्कृतिक स्नेह संम्मेलनाचे उद्घाटक माननीय श्री. राजु भाऊ नौकरकर ( सरपंच ग्रामपंचायत,गिरड), कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री. एस. व्हि. तडस साहेब ( मुख्याध्यापक/ प्राचार्य वि.वि.गिरड), माननीय श्री. संदीप गाडे साहेब ( ठाणेदार पोलीस स्टेशन गिरड ),मान. श्री. डॉ. मुजुमदार साहेब (पी.एस.सी.गिरड), मान. श्री. राकेश भाऊ चंदनखेडे ( तंटामुक्ती समिती अध्यक्ष गिरड), मान.श्री. सुरेश भाऊ घोडमारे (शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, वि . वि. गिरड) तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मान. श्री.अशोकजी आडे साहेब( केंद्रप्रमुख गिरड) सौ. मायाताई चाफले (मुख्याध्यापिका जिल्हा परिषद कन्या शाळा गिरड),मान. श्री. एन.एन. आडकीने सर (मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरड मुले) हे उपस्थित होते.
या स्नेह संम्मेलन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवीत उपस्थितांचे मने जिंकून घेतले. सादर केलेल्या सादरीकरणा मध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स,थीम डान्स, आदिवासी नृत्य,नाट्यछटा, इत्यादी सूक्त गुणांचे सुंदर सादरीकरण करीत सादरीकरण करणाऱ्या सर्व विद्यार्थी कलाकारांचे गिरड नगरीतील ग्रामवासियानी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्ग 11 वि ची कु.प्रांजली मांदाडे या विद्यार्थिनींनी केले तर सूत्रसंचालन वर्ग 8 ची विद्यार्थिनी कु.कृतिका गलांडे व नाभीया पटेल यांनी केले आणि आभार प्रदर्शन माननीय श्री. उमेश वाणी सरांनी केले तसेच या सर्व कार्यक्रमाची धुरा कु. पूजा अग्निहोत्री मॅडम यांनी सांभाळली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अथक परिश्रम घेतले.