Home Breaking News आंतर शालेय, राज्य, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न..! शिक्षणासोबत खेळही महत्त्वाचे—-...

आंतर शालेय, राज्य, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न..! शिक्षणासोबत खेळही महत्त्वाचे—- सुधिर दिवे 

0
61

 राजु कांबळे

तालुका प्रतिनिधी

      समुद्रपुर

 

 

समुद्रपूर : वर्धा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय धुनीवाला चौक येथे स्पोर्ट शोतोकान कराटे- डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न पार पाडण्यात आला.

राष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कार सोहळा प्रसंगी उद्घाटक केंद्रीय मंत्री लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारचे सल्लागार सुधीर दिवे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबतच खेळही महत्त्वाचे असून कराटे खेळ हा अंगीकृत केल्यास बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण व शासकीय भरतीत पाच टक्के आरक्षणासह स्व संरक्षणाचा ही फायदा होतो. असे आपले विचार मंचावरून मांडले.

या सत्कार सोहळ्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक तब्बल १३ खेळाडू यांनी अनेक वर्षाचा इतिहास मोडीत काढीत महाराष्ट्र राज्यस्तरीय, आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धेकरिता पात्र ठरले. त्यातील ४ खेळाडू राष्ट्रीय स्पर्धे करिता पात्र झाले व राष्ट्रीय स्पर्धेत एका खेळाडूने दहा वर्षानंतर ऐतिहासिक यश मिळवित वर्धा जिल्हा ला राष्ट्रीय पदकाचा मान मिळवून दिला.

सत्कार मूर्ती राष्ट्रीय पदक प्राप्त पियुष हावलादार याला आंतर राष्ट्रीय मानकची आरावाझा कंपनीची संपूर्ण कराटे किट भेट देण्यात आली. स्टेट गोल्ड मेडल आयुशी कुरटकर, मोहिनी चुटे, गौरव आशानी, स्टेट सिल्वर मेडल अर्णव लोखंडे, रीधा पठाण, अर्जुन साऊद, स्टेट ब्राँझ मेडल भार्गव खेवले, अभिनव गाडवे, पुनम नवघरे, स्टेट स्पर्धेत सहभागी आनंदी कातरकर, चाहत पेटकर, आयान शेख , यांना सन्मान चिन्ह, शाल व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक मोहन बाबू अग्रवाल तर प्रमुख उपस्थिती माजी विधान परिषद सदस्य रामदासजी आंबटकर, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका माधुरी दीदी, विशेष अतिथी महात्मा फुले प्रतिष्ठान वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष पवन भाऊ तिजारे, वर्धा नगरपरिषदे च्या माजी शिक्षण सभापती श्रेयाताई देशमुख, स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश ईखार, आयोजक स्पोर्ट शोतोकान कराटे – डो इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे, कराटे प्रशिक्षक शिहान उल्हास वाघ, दत्तू कुरेशी, महेश गावंडे, कृष्णा ढोबळे, पराग पाटील,काशिनाथ रघाटाटे, माजी खेळाडू इलाही खान,चेतन जाधव, दिलीप कठाणे, ऋषभ सावसाकडे, साहिल वाघ,बोला गजभिये, शंकर मून तसेच स्पोर्ट कराटे असोसिएशन चे कार्याध्यक्ष संतोष सेलुकर, कोषाध्यक्ष विजय सत्त्याम , सभासद प्रवीण पेठे, निखिल सातपुते, संचालक मंडळातील सभासद श्याम पठवा, मार्गदर्शक यशोधन देशपांडे, पालक प्रतिनिधी डॉ. जितेंद्र खेवले, सुजित हावलादार इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रस्तावना संस्था संचालक सभासद प्रकाश खंडार, संस्था उपाध्यक्ष मोहन मोहिते,तर आभार रामनगर शाखा प्रमुख पूजा गोसटकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here