Home Breaking News पोलीस वर्धापन दिन निमित्त प्रदर्शनी चे आयोजन संपन्न..!

पोलीस वर्धापन दिन निमित्त प्रदर्शनी चे आयोजन संपन्न..!

0
60

राजु कांबळे

तालुका प्रतिनिधी

    समुद्रपुर

 

समुद्रपूर : दिनांक 7 जानेवारी 2025 ला पोलीस मुख्यालय वर्धा द्वारा पोलीस वर्धापन दिन प्रदर्शनी चे आयोजन पोलीस मुख्यालय वर्धा येथे करण्यात आले होते.

या प्रदर्शनीमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड यांना पोलीस स्टेशन गिरड यांचे मार्फत श्री. गाडे साहेब पोलीस उपनिरीक्षक गिरड ,श्री. मनोज भाऊ तेलरांधे पोलीस पाटील गिरड पेठ, व या अभ्यास दौऱ्याचे आयोजक श्री. अतुल भाऊ काळबांडे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषद उच्च माध्यमिक प्राथमिक कन्या शाळा गिरड येथील 80 विद्यार्थिनींना वर्धा मुख्यालय येथे पोलीस प्रदर्शनी पाहण्याकरिता सहभागी करण्यात आले होते.

या प्रदर्शिनी मध्ये पोलीस प्रशासन कशा पद्धतीने कार्य करते त्यांची तपास व त्यांची यंत्रणा कशी कार्य करते, डॉग युनिटचे कार्य व बॉम्ब शोधक पथक, गृहरक्षक दलाचे कार्य, महिला सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली.

प्रदर्शनी पाण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व बिस्किटांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या अभ्यास दौऱ्यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरड पेठ, व गुरुकुल विद्या निकेतन चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब श्री. संदीप जी गाढे सर ,त्यांचे सर्व कर्मचारी सहकारी वृंद, सरपंच श्री. राजूभाऊ नौकरकर, पोलीस पाटील श्री. मनोज भाऊ तेलरांधे समाजसेवक, श्री. अतुल भाऊ काळबांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या सर्वांचे आभार सहभागी झालेल्या शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मायाताई चाफले, श्री. महाजन सर, कु. सुषमा डफ, कु. मनीषा जांभुळे, कु. नंदा पारीसे, कु.भारती डकरे गिरड कन्या, सौ. उषा गुढधे, श्री. मंगेश धनविज, श्री. संतोष मरसकोल्हे, कु.सोनू गजभिये गिरड मुले, व कु. प्रीती कोंडेवार गिरड पेठ हे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here