Home Breaking News आखेर त्यांना बाजी मारली खरच त्या माई बाबा च कर्तृत्वाला सलाम अन्...

आखेर त्यांना बाजी मारली खरच त्या माई बाबा च कर्तृत्वाला सलाम अन् त्याचा धैर्य आणि शौर्य ची सत्कार..!

0
62

प्रमोद झिबड

विशेष प्रतिनिधी 

गीरड/समुद्रपुर

 

दि.04/01/2025 समुद्रपूर तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये बुद्धिबळ स्पर्धेत सोहम संदीप मरसकोल्हे वर्ग सातवी चा विद्यार्थी एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी परिस्थिती हालाखीची असून सुद्धा त्याने जिद्द व चिकाटी सोडली नाही असा विद्यार्थी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव (ह.) येथे शिकत असून त्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शाळेतील विषय शिक्षक श्री.गणेश येडमे यांच्या मार्गदर्शनात पटकाविल्याबद्दल वायगाव येथील समस्त गावकऱ्यांनी त्याला वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

माननीय उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.विलास नरवटे समुद्रपूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी मा.श्री. अशोक गिदेवार साहेब , केंद्रप्रमुख श्री.अशोक आडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगीराज वैद्य,शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल मिरझापुरे सर,सौ. दमयंती पाटील मॅडम, सौ.आडे मॅडम, कु‌. शितल तेलरांधे मॅडम ,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदयगण तसेच वायगाव येथील सर्व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here