चंद्रपूर: येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालय परिसरात करण्यात आले. कार्यशाळेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण 100 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
संस्थेचे सचिव डॉ. अशोकभाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आय.कयू.ए.सी. प्रमुख डॉ. एन. आर. बेग, उपप्राचार्य डॉ.ए.के. महातळे, प्रा.व्हि.एस. बोढाले, डॉ. के. सी. पाटील, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. के. एस. ठाकरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आय. एस. कोंड्रा, एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा.ए.टी. बल्की व विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. हिरदयशाह आत्राम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथिल प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी ‘थ्री पी’झ् ऑफ ग्रेट परफॉर्मर’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात मार्गदर्शक म्हणून शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथिल डॉ. पंकज काकडे यांनी ‘इमोशनल इंटेलिजन्स: अॅन इंटेग्रल पार्ट ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ यावर संबोधन केले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथिल डॉ.राजश्री मार्कंडेवार यांनी ‘कम्युनिकेशन 360 डिग्री: वर्बल एंड नॉन वर्बल कम्युनिकेशन’ या विषयावर तर अंतिम सत्रात डॉ. आय. एस. कोंड्रा
यांनी ‘ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी सॉफ्ट स्किल्स फॉर स्टुडन्टस’ या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप समारंभात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
विविध सत्राचे संचालन डॉ. दिपीका संतोषवार व डॉ. क्षमा गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश येरगूडे, डॉ. एस. एस. वनकर, प्रा. बेताल यांनी केले.
कार्यशाळेला यशस्वी करण्यास डॉ.निरंजने, डॉ.पायघन, डॉ.गोमकर, डॉ.मेश्राम, डॉ.सुलभा वानखेडे, प्रा.मेघा पाटिल, प्रा.सारडा, प्रा.बोबडे, प्रा.शेंडे अन्य सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, जान्हवी कुबडे, सुहास उराडे व इतर विद्यार्थ्यांचे सहकार्य केले.


