Home Breaking News माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
68

चंद्रपूर, दि. 19 : शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये माजी सैनिक,माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांना पुढील शिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांनी दि. 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

लाभार्थ्यांचा अर्ज, शिष्यवृत्ती फार्म, ओळखपत्राची छायांकित प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्तीर्ण गुणपत्रिकेची झेरॉक्स व इतर कुठल्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्ती मिळवायची आहे, अशा पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची शिष्यवृत्ती लागू होत नाही. तसेच ज्या पाल्यांनी सीईटी, जेईई किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट जोडावे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, रूम नं.3, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here