चंद्रपूर :- 11 ऑक्टोबर 2023* – महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातून विदर्भात जनसंपर्क वाढविण्याकरिता 02 ऑक्टोबर 2023 ला गांधी जयंती निमित्त संपूर्ण विदर्भात आम आदमी पार्टी तर्फे झाडू यात्रा रॅलीला सुरुवात झाली. या यात्रेचे आज बाबुपेठ येथे आगमन झाले. बाबुपेठ येथे आप चे राजु कुडे यांच्या अध्यक्षतेखाली आप च्या कार्यकर्ते तर्फे फटाक्याची अतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी आप चे राज्य उपाध्यक्ष श्री धनंजय शिंदे, राज्याचे संघटक संदिप देसाई, राज्याचे संघटक भूषण ढाकुलकर उपस्थित होते.
राजु कुडे यांनी राज्यपदाधिकाऱ्यांना बाबुपेठ मधील आपच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी बाबुपेठ मधून आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीत छान प्रदर्शन करेल अशी आशा व्यक्त केली. राज्यपदाधिकाऱ्यांनी संपूर्ण बाबुपेठ टीम चे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर राज्य पदाधिकाऱ्यांनी बाबुपेठ मधील कार्यकर्त्यांसोबत नाश्ता केला आणि बल्लारपूर कडे रवाना झाले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, सुनील मुसळे, योगेश गोखरे, संतोष बोपचे, राजेश चेडगुलावार, सुनिल भोयर, संतोष दोरखंडे, दिनेश मेश्राम, जयदेव देवगडे, अनुप तेलतुंबडे, सागर बोबडे, अक्षय गोवर्धन, शंकर मरसकोल्हे, दिपक चुणारकर, संदिप कुडे, नितेश कामतकर, अशोक अंबागडे, अंकुश ब्राम्हने, भिमराज बागेसार, अजय बाथव, कालिदास ओरके, मेंढेकर तसेच बाबुपेठ मधील इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.