चंद्रपूर :- मागच्या वर्षी सन्माननीय पक्ष प्रमुख राजसाहेव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आल्यानंतर चंद्रपुरात नेतृत्वात बदल करण्यात आली होती,व युवाना नेतृत्व देण्यात आले.त्यानंतर महिला सेनेच्या शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकुर यांच्याकडे ही जिल्ह्याची जवाबदारी सोपविण्यात आली,परंतु दोन्ही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे दुसरे पदाधिकाऱ्यांनी कधीही महिला जिल्हाध्यक्षाना मान दिला नाही,कधीही सोबत जिल्हा दौरा केला नाही.यातच या दोन्ही जिल्हाध्यक्षानी पक्षासाठी काम करणारे वाहतूक चे जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप केले,परंतु सत्यता ही आहे की जिल्ह्यात यांच्या नेतृत्वात चार ते पांच विंग चे जिल्हाध्यक्ष पद भेटून ही एकटेच आहे,कोणतीही बांधणी नाही,न कोणता कार्यकर्ता यांच्या मागे,तरीही ह्यांना फक्त वाहतूक जिल्हाध्यक्षच दिसत होता,काम करणार्यांचा खच्चीकरण करण्याचं काम सध्या दोघांकडून सुरू आहे,म्हणून मागच्या आठवड्यात मुंबई येथे बाळा साहेब भवन ला शिवसेनेचे नेत्या नीलम ताई गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर आज महिला सेना तसेच वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्यानंतर पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचं निर्धार केला,व शिवसैनिक बनून काम करण्याचा संकल्प घेतला.