चंद्रपुर महानगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्याच्या अतिक्रमणामुळे पार्किंग, रस्त्याची समस्या व रहदारीचे नियोजन अशा अनेक समस्याचे तात्काळ कायमस्वरुपी विल्हेवाट लावा..!

0
21

 

 

*शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा चंद्रपुर ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांची महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी*

 

चंद्रपुर :- येथील चंद्रपुर शहर महानगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्याच्या अतिक्रमणामुळे पार्किंग, रस्त्याची समस्या व रहदारीचे नियोजन अशा अनेक समस्याचे तात्काळ कायमस्वरुपी विल्हेवाट लावण्याची मागणी महानगरपालिका आयुक्त यांना शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा चंद्रपुर ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी

यांनी निवेदनाद्वारे केली.

 

चंद्रपुर महानगर पालिकेची स्थापना 25 ऑक्टोबर 2011 साली झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा मोठ्याप्रमाणात उंचावल्या होत्या. परंतु त्या इतक्या वर्षानंतरही फोल ठरल्या आहेत. चंद्रपुर महानगर हद्दीतील मुख्य रस्त्यालगत व्यापारी व फुटपाथ व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून अतिक्रमणामुळे महानगर पालिका रस्ते हे वार्डातील गल्ली झाली असून वाहन पार्किंग, रस्त्याची समस्या व नागरिकांना रहदारी करणे जिवघेणे ठरत आहे. दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

तसेच आज़ाद बगीचा चौक, तुकुम व शहरातील अनेक भागातील परिसराची अवस्था प्रत्येक पावसाळ्यात अवघ्या तासभरात इरई डॉम सारखी होत असते व पुढील वर्षी ही समस्या उदभवणार नाही, अशी भाबडी अपेक्षा चंद्रपुरकर कर्तव्यशुन्य महानगर पालिकेकडून करीत आहेत.

 

त्यामुळे चंद्रपुर महानगर पालिका हद्दीतील मुख्य रस्त्याची व पावसाळाच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटण्यासाठी महानगर पालिका आयुक्त यानात्याने जबाबदारी स्वीकारुन तात्काळ सदर कामात लक्ष देवुन समस्याचे निराकरण करणे गरजेचे आहे.

 

अन्यथा आम्हाला शिवसेना पद्धतीचा अवलंब पतकरण्यास भाग पाडु नये, असा इशारा देण्यात आला. सदर निवेदन देतांना शिवसेना चंद्रपुर उपजिल्हा प्रमुख तथा चंद्रपुर ग्राहक संरक्षण समिती संपर्क प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला, वैदकीय जिल्हा प्रमुख तथा चंद्रपुर ग्राहक संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष अरविंद धिमान, तालुका उपतालुका सुरेश खापर्डे, राजू रायपुरे व आशिष खरोले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here