Home Breaking News चंद्रपूरात ‘शतक’ चित्रपटाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न..! शेकडो नागरिकांनी पहिला चित्रपट,...

चंद्रपूरात ‘शतक’ चित्रपटाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न..! शेकडो नागरिकांनी पहिला चित्रपट, आमदार किशोर जोरगेवार आणि भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगरचे आयोजन..!

0
29

 

आमदार किशोर जोरगेवार आणि भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगर च्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अखंड राष्ट्रसेवेच्या गौरवशाली प्रवासावर आधारित ‘शतक’ या प्रेरणादायी चित्रपटाचे प्रदर्शन राधाकृष्ण टॉकिज येथे सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी चित्रपट पाहिला. सर्व प्रथम भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवजी हेडगेवार, परमपूज्य माधवजी गोळवलकर गुरुजी, यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

संघाच्या तेजस्वी वाटचालीचे दर्शन घडविणाऱ्या या चित्रपटाचा भव्य उद्घाटन सोहळा यावेळी पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या राष्ट्रभक्ती, संस्कार आणि समर्पणाच्या कार्याचा आढावा या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. संघाच्या विचारधारेचा, सामाजिक कार्याचा आणि देशहिताच्या विविध उपक्रमांचा प्रेरणादायी प्रवास या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवता आला. राष्ट्रीय अभिमान, संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम असलेल्या या चित्रपटामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here