Home Breaking News सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे; विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल – दिनेश दादापाटील चोखारे..!...

सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे; विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल – दिनेश दादापाटील चोखारे..! नूतन कॉन्व्हेन्ट स्कूल, ताडाळी येथे प्रजासत्ताक दिन व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा..!

0
31

 

चंद्रपूर : शालेय शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होऊन त्यांना जीवनात नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन काँग्रेस नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच ज्ञान प्रसारक मंडळ, ताडाळीचे संस्थाध्यक्ष श्री. दिनेश दादापाटील चोखारे यांनी केले.

नूतन कॉन्व्हेन्ट स्कूल, ताडाळी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे व विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

 

दिनांक २६ जानेवारी २०२६, सोमवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ, ताडाळी (जि. चंद्रपूर) द्वारा संचालित नूतन कॉन्व्हेन्ट स्कूल, ताडाळी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष श्री. दिनेश दादापाटील चोखारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणांनी शाळा परिसर देशभक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ, ताडाळीचे अध्यक्ष श्री. दिनेश दादापाटील चोखारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रेस कंपनीचे व्यवस्थापक श्री. रतीलालजी अग्रवाल सर उपस्थित होते. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुबोध कासवटे सर, श्री. हेमराज जुनगरे सर, श्री. राजू आमटे सर तसेच ताडाळी ग्रामचे प्रतिष्ठित नागरिक श्री. प्रफुल्ल गोती सर, श्री. अभय चिवंडे सर, श्री. कवडूजी दिवसे सर आणि नूतन कॉन्व्हेन्ट स्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली कुरेकार मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

 

यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर केलेल्या नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित पालक व मान्यवरांची विशेष दाद मिळवली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका अंजली कुरेकार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये सहाय्यक शिक्षक सीमा कासवटे मॅडम, चित्रा वासेकर मॅडम, धानेश्वरी भगत मॅडम, सुवर्ण झाडे मॅडम, लता भरावी मॅडम, छाया वरती मॅडम, भाग्यश्री निमकर्डे मॅडम, प्रगती खांडारकर मॅडम तसेच अनिता चिवंडे (शिपाई) यांच्यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here