Home Breaking News शिवसेनेच्या मुंबई येथील दोन ऑक्टोंबर रोजी आयोजीत दसरा मेळाव्याला अतिवृष्टीमुळे विदर्भ व...

शिवसेनेच्या मुंबई येथील दोन ऑक्टोंबर रोजी आयोजीत दसरा मेळाव्याला अतिवृष्टीमुळे विदर्भ व मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित न राहण्याचे शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांचे आवाहन..!

0
45

मुंबई : महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फार मोठे संकट कोसळले आहे. दरवर्षी विदर्भ व मराठवाड्यातील पदाधिकारी शिवसैनिक फार मोठ्या संख्येने मोठया उत्साहात सहभागी होत असतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांना मदत करण्यात व्यस्त आहेत.तसेच या भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मुंबई येथे येण्यास गैरसोयीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेता संवेदनशील मनाचे आमचे नेते ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी विदर्भ व मराठवाडा येथील पदाधिकारी व शिवसैनिकांना मुंबई येथील दसरा मेळाव्याला न येण्याचे आवाहन केले आहे..!

तरी मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्याला विदर्भातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहू नये ही नम्र विनंती..

युवराज धानोरकर
जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर शिवसेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here