Home Breaking News चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा.नाम.डॉ.निलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवसा...

चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा.नाम.डॉ.निलमताई गोऱ्हे यांचा वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृद्धांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा…. !

0
44

चंद्रपुर जिल्हा :- शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. मिनलताई आत्राम जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर तसेच संतोष पारखी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चंद्रपुरातील उर्जानगर कोंडी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप करीत उत्साहात साजरा केला.

यावेळी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच देवाळा येथील डेबू सावली वृद्धाश्रमातील वृद्धांना फळवाटप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व वृद्धांनी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या उप-सभापती मा. ना. डॉ. निलमताई गोऱ्हे यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांचे आरोग्य चांगले राहण्याची प्रार्थना करुन आशिर्वाद दिला.

सदर कार्यक्रमाला बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका सौ. कृष्णाताई सुरमवार, शिवसेना उपतालुका प्रमुख विक्की महाजन, भद्रावती युवासेना उपशहर प्रमुख विवेक दुर्गे, शिवसैनिक योगेश मुऱ्हेकर, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here