राजु कांबळे
समुद्रपूर
तालुका प्रतिनिधी
शालेय तालुका क्रीडा स्पर्धांचे आयोजनवर चर्चा.
समुद्रपूर : हिंगणघाट येथील जी.बी.एम.एम. कॉलेज मध्ये आज ( दि. 15 ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारे हिंगणघाट, समुद्रपूर तालुका क्रीडा शिक्षकांची संयुक्त सभा पार पडली.
या सभेत वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी माननीया श्रीमती आशा मेश्राम मॅडम सभेच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी जी.बी.एम.एम.कॉलेजचे प्राचार्य मान. सूनीलजी फुटाणे सर, जमीर अत्तार सर (तालुका क्रीडा अधिकारी), भोजराजजी चौधरी सर (क्रीडा मार्गदर्शक),अनिल निमगडे सर( क्रीडा अधिकारी), संदीप खोब्रागडे सर (ता. क्रीडा अधिकारी) जी.बी एम. कॉलेज चे उप प्राचार्य कुरेशी सर सभा मंचावर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या सभेत वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी माननिया श्रीमती आशा मेश्राम मॅडम यांनी सर्व उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करितांना शालेय तालुका दहा क्रीडा स्पर्धा मैदानी,कुस्ती,कबड्डी,खो खो , व्हॉलिबॉल,बुद्धिबळ,फुटबॉल, बॅडमिंटन , क्रिकेट,कॅरम या सर्व खेळाच्या स्पर्धेची नियमावली शिस्तबद्द , कटाक्षाने आणि काटेकोर पाळण्यात यावी याबद्दल माहिती देण्यात आली. खेळाडूंना मिळणारा शासकीय नोकरीत लाभ,5% खेळाडूंना आरक्षण,क्रीडा सवलत अशा विविध बाबीवर सविस्तर माहिती देण्यात आली.
गत वर्षी प्रमाणे शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मोहता शाळेतील पॅसिफिक ग्राउंड वर पुन्हा एकदा आयोजित करण्याकरिता शाळेचे प्राचार्य सूनीलजी फुटाणे सर यांनी वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी मान. आशा मेश्राम मॅडम यांना संकेत दिले.
या संयुक्त सभेला समुद्रपुर क्रीडा शिक्षक येनोरकर ,पुसदेकर, भुजाडे,चतुर,बुटे,पंदरे या सर्व शिक्षकांची उपस्थिती होती.तर हिंगणघाट क्रीडा शिक्षक विनोद भुते,प्रशांत लेदाडे,मुळे, वरभे, सिडाम, गंधारे, मरोटकर,कस्तुरे, चांभारे, क्रीडा शिक्षिका संजना चौधरी, योगिता तुळणकर, नीलिमा कांबळे,वनिता कांबळे,प्रणिता चिंटूलवार तसेच सर्व क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती होती.
या सभेचे सूत्र संचालन व आभार तालुका क्रीडा संयोजक बी.एल.खांडरे, व राजु कांबळे यांनी केले.


