गिरड विशेष प्रतिनिधि
प्रमोद झिबड
समुद्रपुर
![]()
दि.१ जुलै २०२५.वर्ध्या पासून 59 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तहसीलमध्ये गिरड हे गाव आहे. याठिकाणी शेख फरीद बाबाचा दर्गा आहे. दर्ग्याजवळ तलाव आहे. गावात भोसलेकालीन राम मंदिरही आहे. रामनवमीला याठिकाणी यात्रा भरते. तसेच दहा दिवसीय मोहरम उत्संवही येथे भरतो. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून या गावाकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाणारी साखरबावली हजरत बाबा शेख फरीद दर्गा साखरबावली मोहरम उत्सव मोठ्या हर्ष व उल्हासात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा केला जातो यावेळी दर्गा चेअरमन वाहिद अली यांच्या घरून शाही संदल काढण्यात आला दर्गा चेअरमन यांच्या हस्ते हजरत बाबा शेख फरीद बाबांना चादर चढविन्यात आली.आणि हजरतबाबा शेख फरीद साखर बावली येथे झेंड्याला सलामी देऊन हजरत बाबा शेख फरीद यांना चादर चढविण्यात आली. नंतर हा संदल गिरड येथे प्रस्थान होतात या शाही संदल मध्ये सर्वधर्म समभावाचे सर्व भक्तगण एकत्र येऊन या संदल मध्ये शामिल होतात सर्व धर्माचा समन्वय शांतीचा विचार अशा अनुषंगाने शांततेत्व सुव्यवस्थेत हा मोहरमचा उत्सव साजरा केला जातो ढोल व ताशाच्या गजरात सर्व गिरड नगरी दुमदुमली असता हजरत बाबा शेख फरीद दर्गाह साखरबावली येथे परत येतात दर्गाह कमिटी च्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते भक्तगण भव्य महाप्रसादाचा लाभ संध्याकाळी दहा वाजता कव्वालीचा कार्यक्रम असतो यावेळी सरपंच राजू नोकरकर विनोद शेंडे आयुष शेंडे गुड्डू भाई सनी भाई वकील भाई जाकिर अली कय्युम भाई,पत्रकार कादिर मामु, पत्रकार मनवर शेख,साखर बावली येथील सर्व कर्मचारी वर्ग व बाहेर गाऊन आलेले भक्तगण उपस्थित होते.


