गिरड विशेष प्रतिनिधि
प्रमोद झिबड
समुद्रपुर
दिनांक 13/05/2025 माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, समुद्रपूर यांनी मार्च 2025 मध्ये झालेल्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत 100% निकालाची अभिमानास्पद कामगिरी साधली आहे. शाळेच्या गुणवंत विद्यार्थिनी समता पुरुषत्तम जांगळेकर रा. वायगांव (हळद्या) हिने 98.2% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर राजश्री बोरघरे हिने 96.2% , नमन दीक्षित याने 95.8% , यशविता रोकडे 95% , वंशिका घुमडे 93.4% , सौरभ वंदिले 92.4% , श्रेयस वाघमारे 92.4% , एकता घुमडे 92.2% , नियती देवपूजे 92.% , नैतिक हलवादि 90.6% ,यशस्वी बोडखे 90% गुण मिळवत यश मिळवले.
मुख्याध्यापिका सिस्टर विमल ग्रेस यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकवर्गाचे हार्दिक अभिनंदन केले. समता आणि राजश्री यांचे विशेष उल्लेख करत, त्यांनी कोणतीही ट्युशन किंवा कोचिंग न घेता मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आणि हे दाखवून दिले की मेहनत आणि एकाग्रता हाच यशाचा खरा मंत्र आहे. शिक्षक आणि वर्ग मार्गदर्शकांनी दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचेही विशेष कौतुक करण्यात आले. हा निकाल शाळेच्या बळकट शैक्षणिक पायाभरणीचा आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांचा प्रतिक आहे. हे यश माउंट कार्मेलच्या शैक्षणिक तेजस्वितेच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान ठरत आहे.
या यशाच्या पाठीमागे यशाचे खरे शिक्षक वर्ग तर आहेच परंतु शंभर टक्के सुज्ञ जागृत पालक वर्ग असल्यामुळे या शाळेचा उत्कृष्ट निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे सर्व पालक वर्गांचे हार्दिक अभिनंदन मुख्याध्यापिका सिस्टर विमल ग्रेस यांनी केले आहेत.


