Home Breaking News प्रभु श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमली गिरड नगरी : श्रीराम जन्मोत्सव उत्साहात :...

प्रभु श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमली गिरड नगरी : श्रीराम जन्मोत्सव उत्साहात : घोडा यात्रेला सुरुवात..!

0
59

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

गिरड येथिल सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या इतिहासाला दोन दशकपूर्ती होऊन तिसऱ्या दशकात प्रवेश केला आहे.या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव गेल्या २०९ वर्षापासून निरंतर सुरु आहे. रविवारी ६ एप्रिलला दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी मंदिरात वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरेने महिलांनी रामलल्लाची विधीपुर्व पुजा अर्चना करुन रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी उपस्थितीत हजारो राम भक्तानी एकमेकावर गुलाल उधळुन आनंद उत्सव साजरा केला. यावेळी मंदिर परीसरात हजारो राम भक्त उपस्थीत दर्शविली भक्तीमय वातावरणात जिकडे तिकडे प्रभु श्रीरामचंद्रचा जय घोषाने संपुर्ण गिरड गाव दुमदुमले होते.यावेळी मंदिर कमेटिच्या वतीने उपस्थितीत मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महाराष्ट्र, गोवा मठ मंदिर प्रमुख अनिलजी सांबरे,वर्धा जिल्हा संघ प्रमुख जेठानंदजी रातपुत,सरपंच राजु नौकरकर,सरपंच विलास नवघरे, माजी सरपंच विजय तडस, हभप श्रीरामजी रोडे महाराज, पत्रकार गजानन गारघाटे, झेप फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार गिरडे, माजी जिल्हा फकीराजी खडसे, अरुण मोटघरे,विश्व हिंदू परिषदेचे तालुका महामंत्री निर्भय पांडे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी ३ वाजता श्रीराम देवस्थान कमेटीने मंदिर परीसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन केले यावेळी हजारो रामभक्तानी महाप्रसादाचा आनंद घेतला. यावेळी गिरड गावचे वातावरण राममय झाले होते.हा संपुर्ण कार्यक्रम शांततेत होण्याकरीता गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गोमेद पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी कडक पोलिस बंदोबस्त लावला होता. संपुर्ण कार्यक्रमला येशस्वी करण्यात करीता श्रीराम मंदिर देवस्थान कमेटीचे अध्यक्ष बलवंत गाठे, उपाध्यक्ष वसंतराव पर्बत,सचिव संदिप शिवणकर, विश्वस्त शालिकराव लांडे, सुधाकर बाकडे,पुनम ब्राह्मणवाडे, नंदनीताई टिपले, आदिसह गावकरी व रामभक्तांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here