Home Breaking News हिंगणघाट होमगार्डच्या सतर्कतेने खेळण्यांचा माल विक्रेत्याला परत मिळाला.!

हिंगणघाट होमगार्डच्या सतर्कतेने खेळण्यांचा माल विक्रेत्याला परत मिळाला.!

0
57

 

मनवर शेख

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

 

हिंगणघाट – राम नवमीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर असलेल्या होमगार्ड पथकाने आपल्या सतर्कतेने एका खेळण्यांच्या विक्रेत्याचा हरवलेला माल शोधून त्यास परत सुपुर्द केला. घटना ३ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. होमगार्ड अधिकारी आणि सार्जेंट पेट्रोलिंग करत असताना डागा मिलच्या मागे एक व्यक्ती संशयितरीत्या फिरताना आढळला. विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव सूरज तिडेकर असल्याचे सांगितले. त्याच्या मालवाहक गाडीतून खेळण्यांनी भरलेला अंदाजे ₹२५,००० किमतीचा माल हरवला होता. याची गंभीर दखल घेत होमगार्ड अधिकारी आकाश वाकेकर आणि सार्जेंट आकाश खरखाटे यांनी शोधमोहीम सुरू केली. मध्यरात्रीच त्यांना खेळण्यांचा बोरा सापडला. त्यांनी त्वरित सूरज तिडेकर याला फोन करून त्याच्या मालाविषयी माहिती दिली आणि सकाळी पोलीस ठाण्यातून तो सुपुर्द करण्याचे आश्वासन दिले.

 

आज सकाळी होमगार्ड पथकाने प्रामाणिकपणे संपूर्ण माल सूरज तिडेकर याला सुरक्षितरित्या परत दिला. सामान परत करतेवेळी पोलीस उप निरीक्षक पाटील साहेब, तालुका समादेशक कैलाश रोकडे, वरिष्ठ पलटन नायक मनोहर धवळे, चंद्रशेखर देशकर, पलटन नायक आकाश वाकेकर, सार्जेंट आकाश खरखाटे, सैनिक अब्दुल कदीर बख्श, राजाबाबू मोगरे आणि करण पंचभाई उपस्थित होते *होमगार्ड पथकाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होमगार्ड दल केवळ आपत्कालीन परिस्थितीतच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीसाठी सतत तत्पर असते. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि जबाबदारीमुळे एका व्यापाऱ्याचा मोठा आर्थिक तोटा टळला. वेळप्रसंगी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या या होमगार्ड जवानांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे समाजातील विश्वास दृढ होतो आणि पोलीस प्रशासनाला महत्त्वाची मदत मिळते. हिंगणघाटमधील नागरिकांनी देखील होमगार्ड पथकाच्या या प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवेला मनःपूर्वक सलाम केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here