शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा संपन्न..!

0
8

 

स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात दि. १० आणि ११ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा आयोजित करण्यात आली. सत्यानवेशी २.० या बॅनर खाली गत अनेक वर्षा पासून ही स्पर्धा विधी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येते. यावर्षी देखील सदर स्पर्धेत संपूर्ण भारतातून विविध राज्यातील १४ चमुने सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने बंगलोर येथील स्कूल ऑफ लॉ अलायन्स विद्यापीठ, विजयवाडा, गुण्टूर, जळगाव, अमरावती, नागपूर, पुणे अशा विविध शहरातील प्रसिद्ध विधी महाविद्यालयाने या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत भाग घेतला होता.

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील दोन चमुने या स्पर्धेत सादरीकरण केले. सदर स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी चंद्रपूर जिल्हा बार अससोसिएशनचे प्रसिद्ध विधिज्ञ प्रकाश बजाज, वैशाली टोंगे, अविनाश खडतकर, कल्याण कुमार यांनी परीक्षकाची जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेची उपांत्य फेरीसाठी नागपूर उच्च न्यायालयातील प्रसिद्ध विधिज्ञ अनिरुद्ध चदिकर, आशिष कडुकर, यश कुल्लरवार, अमोल हुंगे यांनी परीक्षक म्हणून सहकार्य केले. स्पर्धेचा अंतिम सामन्यासाठी बंगलोर येथील स्कूल ऑफ लॉ चमू आणि नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिक्षाभूमी विधी महाविद्यालयाची चमू पात्र ठरली होती. अंतिम सामन्यासाठी पाच न्यायमूर्तीचा समावेश असलेले घटनात्मक खंडपीठ स्थापित करून नागपूर उच्च न्यायालायतील माजी न्यायाधीश मुरलीधर गिरटकर यांच्या सह ऍड. अनिरुद्ध चांदेकर, ऍड. आशिष कडुकर, ऍड. यश कुलरवार, ऍड. अमोल हुंगे यांनी परीक्षाकाची जवाबदारी पार पाडली. या स्पर्धेत बंगलोर येथील स्कूल ऑफ लॉ अलायन्स विद्यापीठ विजयी ठरून प्रथम क्रमांक पटकावला तर नागपुर येचील डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमी विधी महाविद्यालय उपविजेता ठरली. स्कूल ऑफ लॉ, अलयान्स विद्यापीठ, बंगलोरचा विद्यार्थी डी. कृष्णा याची सर्वोत्कृष्ट स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली.

 

सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. माजी न्यायाधीश मुरलीधर गिरटकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. पंकज काकडे यांनी केले. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राष्ट्रीय अभिरूप न्यायलाय स्पर्धा ही कायद्याचे ज्ञान संपादन करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट असे व्यासपीठ असल्याचे सांगितले. चंद्रपूर आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागात एकमेव विधी महाविद्यालय असल्यामुळे ही जवाबदारी यशस्वी रित्या पार पाडणे आव्हनात्मक असले तरी आपल्या संस्थेच्या सहकार्याने शक्य झाल्याचे डॉ. ऐजाज शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुरलीधर गिरटकर यांनी सर्व स्पर्धेकांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच या स्पर्धा भविष्यातील वकिली व्यवसाय करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ असल्याचे सांगितले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभिरूप न्यायालय स्पर्धा यशस्वी रित्या आयोजित केल्याबद्दल प्राचार्य आणि संपूर्ण मूट कोर्ट क्लबच्या पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन केले. कायद्याचे ज्ञान संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सामाजिक दायित्व इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक असून या विद्यार्थ्यांनी त्याची जाणीव ठेवावी असा आग्रह त्यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला.

 

कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एल. एल. बी. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी कु. तस्मिया बेग व कु. प्रगती बाला यांनी तर आभार प्रदर्शन मूट कोर्ट क्लबच्या विद्यार्थी अध्यक्षा कु. ममता मदान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्व मूट कोर्ट क्लबच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here