मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
समुद्रपूर. वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपूर येथे आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती (धान्य मार्केट) मध्ये परमपूज्य महात्मा एक सेवक मंडळ नागपूर, शाखा हिंगणघाट अंतर्गत समुद्रपूर परिसर यांचे सौजन्याने व सर्व सेवकांच्या वतीने समुद्रपूर येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन पार पडले.
दुःखी, गरीब व अज्ञानी मानवास भगवंत प्राप्तीचा निष्काम भावनेने परिचय करून देऊन सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे व वाईट, व्यसन, अंधश्रद्धा यापासून परावृत्त करणारे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे जनजागृती करीता या मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनामध्ये सकाळला हवन कार्य पार पडून नंतर मानव जागृती वर भजन व शोभायात्रा काढण्यात आली होती. दुपारला भगवंतांचे व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे मानव धर्म शिकवणीवर चर्चासत्र संपन्न झाले. सायंकाळ प्रसाद व भोजन यांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळला परमात्मा एक भजन मंडळ शाखा हिंगणघाट, परमात्मा एक मित्र भजन मंडळ चिंच भवन नागपूर तसेच परमात्मा एक भजन मंडळ शिर्सी यांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने समुद्रपूर नगराध्यक्षा योगिताताई सचिन तुळणकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर मंडळाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, उद्घाटक प्रवीणजी उराडे कोषाध्यक्ष संचालक संजयजी महाकाळकर संचालक, सुरजलालजी जांभूळे सचिव, मोरेश्वरजी गभने सहसचिव,आयोजक प्रदीपजी भोयर समुद्रपूर ई. मार्गदर्शक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन भागवतजी धोटे यांनी केले
या संमेलनामध्ये सहभागी समुद्रपूर, हिंगणघाट, धुमंखेडा, वायगाव गोंड, परसोडी, उमरी, लाहोरी, पारोधी, हिवरा, वडगाव, लसनपुर, पाईकमारी, बर्फा, सुकळी, वायगाव, वाघेडा,तास, परडा, मांगली, उबदा, गवा, आंजती,जाम,शेडगाव, आजदा, हळदगाव,गोविंदपुर, खंडाळा, कांढळी, मांडगाव,सावंती, सुजातपूर, तरोडा, शेगाव, येरनगाव, चिंचोली, कोरा, वणी, वाघोली, सातेफळ,नांदगाव, बुरकोनी, नंदोरी इत्यादी गावचे सेवक उपस्थित होते.


