शिक्षणसम्राट यांच्या चिरंजीवाची बॉलीवूड क्षेत्रात गगनभरारी.!

0
5

 

सय्यद इसा

जिल्हा प्रतिनिधी

नांदेड.

मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष आदरणीय श्री.अभियंता प्रशांतजी ठमके साहेब यांचे चिरंजीव अभिनेते सुशांत ठमके हे आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपट ‘पिंटू की पप्पी’ याद्वारे बाॅलिवूड च्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.चित्रपट लवकरच म्हणजे 21 मार्च 2025 ला मोठ्या दिमाखात प्रदर्शीत होत आहे.आणि चित्रपटाची पूर्ण टिम त्यासाठी सज्ज झाली आहे.

दि.10/03/2025 रोजी मुंबई येथे या चित्रपटातील सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांसह प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया, गायक उदित नारायण,अभिनेत्री रेखा,अजय देवगण सारख्या सुपरस्टारच्या उपस्थितीत एक प्रमोशन सोहळा संपन्न करण्यात आला.त्यात चित्रपटाला शुभेच्छा देण्यात आल्या.

त्याचप्रमाणे किनवट येथे ‘पिंटू की पप्पी या बिग बजेट हिंदी चित्रपटातील अभिनेता सुशांत ठमके व टिम मधील नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य,माधुरी पवार यांच्यासह 50कलावंतांच्या संगीत कला व नृत्याचा आविष्कार 18 मार्च 2025 ला सायंकाळी 05:30वाजता प्रत्यक्ष नजरांना किनवट व परिसरातील जनतेसाठी मिळणार आहे.सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला असून सर्वांनी परिवारासह पहावा असे अवाहन अभियंता प्रशांत ठमके यांनी केले आहे.

मुळात एक अभियंता असलेले प्रशांत ठमके साहेब यांनी सर्व प्रथम शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात आपले भरघोस योगदान देत नांदेड जिल्ह्य़ात गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहचवत शिक्षणसम्राट म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे.ते म्हणतात ना आपण इतरांच्या हातावर मेहंदी लावण्यास पुढे गेलो तर नकळत थोडा रंग आपणास सुद्धा लागतो…अगदी तसेच तुम्ही गरिबांचे आयुष्य सुंदर केले.तेव्हा आपला चिरंजीव योग्य संस्कारातून पुढे मोठा अभिनेता निपजतोय…खरच आहे.

तसेच अभिनेते सुशांत ठमके यांची प्रचंड चिकाटी, जिद्द,मेहनत आणि योग्य मार्गक्रमण यामुळेच ते इथपर्यंत पोचले आहेत. ‘पिंटू की पप्पी’ हा चित्रपट नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या व त्यांच्या पत्नी यांच्या निर्मीतीत संपन्न झाला असून अजय-अतूल सारख्या जागतिक संगीतकारांचे सहयोग या चित्रपटास मिळाले आहे.

या चित्रपटाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास आपणास दि.18 मार्च 2025 ला मातोश्री कमलताई ठमके शिक्षण संकुलाला भेट द्यावी लागेल,याच देही याची डोळा हा सोहळा अनुभवावा लागेल.

‘पिंटू की पप्पी’ या चित्रपटाच्या निमित्ताने आदरणीय अभियंता प्रशांतजी ठमके साहेब,तसेच अभिनेता सुशांत ला नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद श्रीक्षेत्र माहूरगड तालुकाध्यक्ष शेषराव पाटील यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here