टाकळी येथे जबरी चोरी, सात लाख रुपयाचा ऐवज लंपास.!  

0
4

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी

नांदेड.

श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी ) तालुक्यातील टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे (वय 53 वर्षे )व्यवसाय शेती यांच्या घरी दि. 12 मार्च रोजी रात्रीला जबर चोरी झाली. त्यात 7 लाख 13 हजार 800 रुपये किमती सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला.

बाबाराव मुसळे हे पत्नीसह शेतात तिळाला पाणी देण्यासाठी गेले होते.ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील लॉकर तोडून 7 लाख 13 हजार 800 रुपयांचा सोन्याचा एवज तिजोरी तोडून चोरून नेल्याची घटना दि 12 रोजी रात्री 2 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे

 

माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे हे परिवारासह राहतात त्यांना दोन मुले असुन दोघे नौकरीस असल्याने मुंबई येथे राहतात.ते व त्यांची पत्नी लक्ष्मी असे दोघे जण गावातच राहतात. मुलगा विकास याचा गेल्याच वर्षी विवाह झाला असुन तो मुंबई येथे राहतो. दि 12/03/2025 रोजी रात्री 10.30 वा चे सुमारास ते व माझी पत्नी घराचे दरवाज्यांना व गेटला कुलूप लावून पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होतो उजेड्यासाठी बॅटरी घेण्याचे विसरल्यामुळे पत्नी ला न बॅटरी घेण्यासाठी परत घरी आलो घरी येवून बँटरी घेतली घराचे दरवाजा व गेट ला कुलूप लावून परत शेतात गेलो.

 

बाबाराव मुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेतातील तिळाला पाणी दिल्यानंतर आम्ही रात्री 02.00 वा घरी परत हा आम्हाला घराचे गेट व मुख्य दरवाज्याचे कुलूप काढलेले व ते दरवाजे उघडे दिसले आम्ही घरात जावून सता घरातील बेडरूमचे कुलूप काढून दरवाजा उघडा केलेला दिसला बेडरूम मधील लोखंडी कपाट, सींग टेबलचे दरवाजे उघडे होते. व त्यातील सामान बाहेर अस्तावेस्त पडलेले होते. अस्तावेस्त पडलेल्या कपाटात लॉकर मध्ये ठेवलेल्या सोन्याचे दागीन्याचे रिकामे बॉक्स पडलेले दिसल्याने आम्हास घरात चोरी समजले. त्यानंतर आम्ही घरात इतरत्र पाहणी केली असता किचन रूम मधील देवघराचे ड्राव्हर उघडे एवेळी आम्ही पोलीसांना आमचे घरात चोरी झाल्याचे माहिती दिली. पोलीसांनी घरी येवून घराची पाहणी माहिती घेतली. आज रोजी आमचे घरी पोलीसांचे डॉग पथक व फिंगरप्रिंट पथक यांनी येवून तपासणी तर मी व माझी पत्नीने कपाटातील सामानाची बारकाईने पाहणी केली असता माझे पत्नीने कपाटाचे माझा मुलगा व सुनेस लग्नात भेट दिलेल्या सोन्याच्या दागीन्याचा विविध बॉक्स लॉकर मध्ये ठेवले होते. 11. 2,90,000 – सोन्याचे पाटली जोड एक नग 40 ग्रॅम कि.अ. 02. 4,14,050/- एका सोन्याचे ॉम कि.अ. 03. 9750/- मणी मंगलसुत्र 5 ग्रॅम कि. अ असे एकूण किंमती 7,13,800 रूपये मुद्देमाल रोपीतांनी चोरून नेला आहे.

अशी फिर्याद बाबाराव मुसळे यांनी दिल्याने सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी टाकळी येथे जाऊन घटनेचा पंचनामा करत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोऊपनि पालसिंग ब्राह्मण एएसआय बाबू जाधव पोका पवन राऊत हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here