Home Breaking News वडगाव (पाटी) ते पिंपळगाव रोड वर मरणाला आमंत्रण देत असलेला धोकादायक पुल.!

वडगाव (पाटी) ते पिंपळगाव रोड वर मरणाला आमंत्रण देत असलेला धोकादायक पुल.!

0
52

राजु कांबळे 

तालुका प्रतिनिधी 

समूद्रपुर.

समुद्रपुर : समुद्रपुर तालुक्यातील वडगाव ते पिंपळगाव रोड चे खडीकरणाचे काम सुरू आहे. या आधी ह्या रोड ची अतंत्य दयनीय अवस्था होती. हा रोड वाहतुकीचा असून शेतकऱ्यांसाठी एकमेव रोड आहे. परंतु पिंपळगाव लगत रोड वर असलेला पुल पाऊसामुळे वाहून गेला सोबतच त्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्याने वाहून गेला तेव्हापासुंचा पुल त्याच दशेत आहे. आणि एवढा भयंकर धोकादायक पुल झाला की रात्री ला जर गाडी चे लाईट कमजोर असेल तर निश्चित अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. पुलाला पडलेले गड्डे , बाहेर निघालेल्या सळाखी यातून गाडी वाल्यांचे जीव वाचणे कठीण आहे.

ह्या पुलावर ना अपघात ग्रस्त बोर्ड, ना स्ट्रीट लाईट, ना दगड लाऊन पांढरे केले गोटे यातून अपघाताला निमंत्रण असे दिसून येते. त्या रोडचे खडीकरण सुरू असून त्या खचलेल्या पुलावर दगड, पांढरे गोटे लाऊन ठेवायची फुरसत pwd विभागाला मिळाली कशी नाही ही कमालच आहे. शेतकरी वर्ग,मजूर वर्ग, वाहतुकीच्या गाड्या यांना खूप मोठा ह्या पुलाचा सामना करून जीव मुठीत घेऊन रात्रीला प्रवास करावा लागत आहे. ह्या सर्व बाबी कडे pwd विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन उपाय योजना करणे गरजेचे आहे अन्यथा प्रवाशांना जीव गमवावा लागेल हेही तेवढे खरेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here