Home Breaking News विजय कांबळे सारख्या होतकरू तरुणांना मदत करताना आत्मिक समाधान मिळतो.!  प्रशांत राठोड,...

विजय कांबळे सारख्या होतकरू तरुणांना मदत करताना आत्मिक समाधान मिळतो.!  प्रशांत राठोड, मुंबई.

0
56

सय्यद ईसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड. 

दि.१७ फेब्रुवारी: आर्थिक दृष्ट्या गरीबांना मदत करताना मला आत्मिक समाधान मिळतो, विजय कांबळे सारख्या एका होतकरू तरुणाला त्याच्या तुटपुंज्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी मदत करुन त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा या माणुसकीच्या भावनेतून आज एका भव्य अशा श्री दत्त कृपा टी स्टॉलचे उद्घाटन करताना मला मोठ समाधान मिळाले आहे.यातून कांबळे यांचेही जीवनमान नक्कीच उंचावेल! ” अशा सद्भावना प्रशांत राठोड यांनी व्यक्त केल्या.

तालुक्यातील पालाईगुडा येथील स्व.पिपळीबाई पुरसिंग राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र प्रशांत पुरसिंग राठोड यांच्या हस्ते माहूर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील श्री दत्त कृपा टी स्टॉल चा उद्घाटन सोहळा प्

मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

जवळपास तीस वर्षांपासून आपल्या मनमिळाऊ व गोड स्वभावाप्रमाणेच चहा प्रेमी नागरिकांना आपल्या लज्जतदार गरमागरम चहाची माफक दरात सेवा देत असलेले विजय कांबळे यांचे आजपर्यंत तहसीलच्या प्रशासकीय इमारतीसमोरील मुख्य प्रवेशद्वाराजवळील बाजुच्या जागेवर एक छोटेशे ताटव्याचे चहाचे दुकान होते.ज्याचे आज दि.१७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पालाईगुडा येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे राहत असलेले प्रशांत पुरसिंग राठोड यांनी मोठ्या मनाने दातृत्वभावना दाखवत पुढाकार घेऊन केलेल्या भरीव आर्थिक मदतीने एका भव्य टी स्टॉल मध्ये रुपांतर झाले आहे. त्याचे उद्घाटन आज दि.१७ रोजी त्यांच्याच हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डॉ.निरंजन केशवे,कॉ.शंकर सिडाम यांनीही विजय कांबळे या होतकरू टी स्टॉल चालकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

तर अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी जो बड़ा वह नहीं होता है जो

आसमान में परचम लहरा दे

बल्कि बड़ा वह होता है

जो छोटे को बड़ा बना दे

या शब्दांत दानशुर व्यक्तिमत्त्व प्रशांत राठोड यांची स्तुती केली.

श्री दत्त कृपा टी स्टॉल चे उद्घाटनानंतर झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे होते.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष नाना लाड, भाजपाचे ओबीसी प्रदेश सचिव अनिल वाघमारे, डॉ.निरंजन केशवे, डॉ.अभिजीत अंबेकर,कॉ.शंकर सिडाम, कॉन्टॅक्टर विजय राठोड, गौतम महामुने,राकॉं.अजित पवार पक्षाचे ता.अ. अमित राठोड, पत्रकार बजरंगसिंह हजारी, दत्ता शेरेकर या प्रमुख पाहुण्यांसह पत्रकार विलास आडे, इलियास बावानी,गजानन

भारती, वसंत कपाटे, नंदकुमार जोशी,राज ठाकुर, बाबाराव कंधारे, गणेश खडसे यासह प्रतापसिंह हजारी, अजयसिंह हजारी, mo जाधव यांनी तर आभार प्रदर्शन टी स्टॉल चालक विजय कांबळे यांनी केले.यावेळी किनवट,माहूर तालुक्यातील स्व.पिपळीबाई पुरसिंग राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सन्मानार्थ बंजारासमाजातील नागरिकांसह सर्वधर्मीय जनसमुदाय व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here