मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
![]()
हिंगणघाट शहरातील अमृत योजना मलनिस्सारण तथा शहरातील इंदिरा गांधी चौक ते फिदाहुसेन पेट्रोल पंप या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी नप च्या माजी नगरसेविका तसेच माजी बांधकाम सभापती सौं शुभांगी डोंगरे यांनी आज दि. 10 फेब्रुवारीला पालकमंत्री ना. पंकज भोयर यांना वर्धा येथे भेटून केली.
या संदर्भात सौं शुभांगी डोंगरे यांनी एका शिष्टमंडळासह पालक मंत्री ना. भोयर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अमृत योजनेत मल:निस्सारण आणि स्वच्छ पाणी पुरवठा योजने करीता हिंगणघाट नपची निवड झाली होती. या दोन्ही योजना 2017 पासून बांधकामास सुरुवात झालेल्या असून आता आठ वर्षे होतं असूनही अजून पर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. या योजनेत मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा त्यांचा आरोप आहे. ह्या योजना पूर्ण करण्याचा कालावधी हा दोन वर्षे अकरा महिने असा होता.यात शहरातील सांड पाणी एस टी पी प्लॅन्ट पर्यंत नेऊन प्रक्रिया करून पाणी शुद्ध करून नदीत सोडायचे होते. परंतु नियोजन पद्धतीने काम न करता या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप लाईन टाकल्या मुळे असंख्य लोकांच्या घरात पाणी साचून राहते त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा वास सहन करावा लागतं असून नदी पात्रात दूषित सांडपाणी सोडल्या जात आहे.
अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठ्याकरीता नवीन अकरा टाकी बांधण्यात आल्या व निकृष्ट दर्जाची पाईप लाईन टाकण्यात आली त्यामुळे शहरात मोठया प्रमाणावर लिकेज होतं असून नागरिकांच्या घरी दूषित पाणी पुरवठा होतं आहे.
या योंजनेची त्रीसदस्यीय समिती नेमून चौकशी करण्यात यावी व जो पर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही तो पर्यंत अमृत योजना फेस दोनचे काम करण्यात येऊ नये या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित यंत्रणेवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
तसेच इंदिरा गांधी पुतळा ( विठोबा चौक ) ते फिदा हुसेन पेट्रोल पंप या दरम्यान झालेल्या सिमेंट रोड चे काम मागील एक वर्षात करण्यात आले. या रोडला मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडला भेग्या पडल्या असून व अनेक भागातील गट्टू अतिशय हलक्या दर्जाचे बसविण्यात आलेले आहेत. या कामाची सखोल चौकशी केल्यास मोठे बिंग फुटू शकते.असा आरोप निवेदनातून सौं शुभांगी डोंगरे यांनी केला आहे.
यावेळी निवेदन देतांना सर्वश्री समाजसेवक रुपेशभाऊ लाजूरकर, दर्शनभाऊ बाळापूरे उपस्थित होते.!
हिंगणघाट शहरातील माजी नगरसेविका तसेच बांधकाम सभापती सौ.शुभांगी डोंगरे यांनी अमृत योजनेअंतर्गत सिवरेज व पाणी पुरवठा योजना तसेच इंदिरा गांधी चौक ते फिदा हुसेन पेट्रोल पंप रोड ची सखोल चौकशी करण्याची वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री श्री.पकंजजी भोयर यांना भेटून केली मागणी.


