Home Breaking News वानोळा येथे दारूबंदी साठी माहूरचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे आक्रमक..!

वानोळा येथे दारूबंदी साठी माहूरचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे आक्रमक..!

0
65

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

 

माहूर तालुक्यातील वानोळा येथे दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्यासाठी गावातील नव तरुणांनी युवा ग्राम विकास मंडळ स्थापन केले. या युवा मंडळाने गावात तरुण मुलाची बैठक घेतली या बैठकीत दारू सह अवैध धंदे बंद करण्यासाठी चा निर्णय घेतला या निर्णयाची अमलबजावणी दुसऱ्या दिवसापासून केली. प्रथम युवकाच्या वतीने ग्रामपंचायतला निवेदन दिले, दुसऱ्या दिवशी गावात शाळाकरी विद्यार्थी, कर्मचारी, गावकरी व युवा तरुणांनी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.तिसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन माहूर व वरिष्ठांकडे लेखी निवेदन दिले.या निविदाची दखल माहूरचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांनी घेतली आणि पोलीस ताफ्यासह वानोळा येथील दोन दारू विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले. अनेक घरांची झडती घेतली मात्र जनजागृती अगोदरच झाल्याचे कारणाने इतर ठिकाणी दारू सापडली नाही.गावात पोलीस ताफा पाहताच गावकरी मंडळींना उत्साह आला. यावेळी माहूरचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. उपसरपंच अभिजीत राठोड, कृष्णकुमार राठोड, सुदाम चव्हाण, पत्रकार पंडित धुप्पे,युवा विकास ग्रुपचे सर्व तरुण मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पोलीस ताफ्यात ठाणेदार शिवप्रकाश मुळे, ब्राह्मण, गायकवाड, बीट जमादार गेडाम, जाधव, गजानन चौधरी, पोलीस कर्मचारी पुसनाके मॅडम, राठोड मॅडम, भोपळे यांनी महत्वाची कामगिरी केली याबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here