मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
वेणी : दि.०४ फेब्रु 25:- वडनेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर उच्च वेणी – जागोंना येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सारिका चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिपक कांबळे मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा वेणी, डॉ. संजय दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये पशुरोग निदान शिबिर, आरोग्य शिबिर, ग्रामसफाई, परिसर स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बौद्धिक सत्रात आजचा युवक व डिजिटल साक्षरता, ग्रामीण विकासात युवकाची भूमिका, भारतीय शिक्षण प्रणाली व आजचा युवक व्यक्तिगत विकासात रासेयोची भूमिका, जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विषयावर विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.
रासेयो शिबिर समारोपिय कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य डॉ. सारिका चौधरी, सौ. वंदनाताई लोणबळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वेणी, सुभाष उगे पोलीस पाटील, डॉ. विनोद मुडे, माजी विद्यार्थी राहुल दुरतकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
शिबिर यशस्वीतेकरिता सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश बहादे, आणि प्रा. आरती देशमुख तसेच रासेयो स्वयंसेवक कु.भावना मडावी, संस्कृती भांबेवार, तेजस्विनी बावणे, मनीषा राखुंडे, सतीश पोतले, गौरव शेंडे, तेजस महल्ले, यश पुरी, प्रणव घोडे, हर्षल वाघ, प्रकाश वाकडे, अभय पोहाणे, प्रफुल शिंदे, रिक्की मून यांनी अथक परिश्रम घेतले. संचालन डॉ. पंकज मुन यांनी तर आभार कु. वैष्णवी बावणे हिने केले.


