Home Breaking News ‘माहूर’ तालुक्यात वझरा (शेख फरीद) हे गाव “संरक्षण सेवेचे ‘गाव म्हणून नाव...

‘माहूर’ तालुक्यात वझरा (शेख फरीद) हे गाव “संरक्षण सेवेचे ‘गाव म्हणून नाव लौकीक.!

0
71

सय्यद इसा

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

 

माहूर:- अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागात वसलेले आणि डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी असलेले देवी देवतांच्या मध्यभागी असलेले छोट्स खेड गाव म्हणजे वझरा. या गावात अगोदर कोणीही सरकारी सेवेत नव्हते पंरतु कोणताही वारसा गावाला लाभला नसून आता गावाचा विविध सेवेत जवळपास शतक पूर्ण आकडा करण्याच्या मार्गावर आहे.

विशेष म्हणजे पोलीस दल मुले -12 मुली – 5 एकुन – 17 , वनरक्षक – 1, सैन्यदल – 3, अग्नीशामक – 3 ,वैधकीय क्षेत्र 2 मुली, पोस्ट खाते-2 ,महसूल खाते – 1 , महाराष्ट्र सुरक्षा रक्षक , (M.S.F.) 4, वकील क्षेत्र – 2, पंचायत समिति लिपिक – 1, होमगार्ड-3, ग्रामसेवक-1 ,पशु वैदिकिय डॉक्टर -1 ,मैस्को सुरक्षारक्षक – 5 ,शिक्षक व शिक्षकत्तर – 8 व इतर सुरक्षारक्षक – 10 असे मुली व मुल सेवा बजावत आहे हे विशेष .

या गावात इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परीषद उच्च प्राथ शाळा, शिक्षण महर्षी कै. माधवराव पांडाग‌ळे साहेबांच्या कर्तत्वातून आदरणीय बालाजी पांडागळे साहेबांनी सन – 2001 मध्ये उभा केलेली कै. गोंविदराव पाटील मा . व उच्च मा. विद्यालय या शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी सायन्स, आर्ट्स अशी भव्य इमारत उभी केली या शाळेमुळे आणि तेथे कार्यरत सर्व शिक्षका मुळे हे विद्यार्थी घडत आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.

सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वदुर ही मुले आपली सेवा बजावत आहेत आता फक्त अपेक्षा आहे ती मोठा अधिकारी होण्याची तर बघुया हे गावाचे स्वप्न कोण पूर्ण करते ते बस एवढेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here