मनवर शेख
ब्युरो चीफ आवाज 24 न्यज
हिंगणघाट.
शनिवार दि.11.1.2025 ला. श्री दुर्गा माता मंदिर दाभा यांच्या वतीने शांकबरी नवरात्र महोत्सव व देवी भागवत पुराण सप्ताह हरिभक्त परायण
![]()
श्री. तुळशीरामजी महाराज यांच्या सुश्राव्य मधुर वाणीतून सोहळा संपताच रात्री आठ वाजता मॉ. भवानी गोंधळी संच वायगाव (ह.) तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा यांचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला आणि श्री.गणेशाच्या गणानी व गोंधळ गीत गायनाला सुरुवात केली असता गायक व उत्कृष्ट संभळ वादक श्री.प्रमोद दे.झिबड,तुनतुना वादक श्री.प्रमोद वि.खडतकर, मंजिरा वादक श्री. गणेश श्रावणे, आर्गन वादक श्री.लक्ष्मण मुडे, खंजिरी वादक श्री.नामदेव मानकर,
टाळ वादक कुमार नयन प्रमोद झिबड,गोंधळ गीत गायना मधून संचानी दाभा गाव वाशियांचे मन मोहित केले. उपस्थित बाल गोपाळ, महिला व पुरूष आणि समस्थ गावकरी मंडळी यांनी खूप खुप मनापासून गोंधळी संचाचे आभार मानले.
आवाज 24 न्यज


