राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर
समुद्रपूर:- नुकत्याच पार पडलेल्या नांदेड येथे 22 व्या राज्यस्तरीय सीनियर महिला व पुरुष वूशू अजिंक्यपद स्पर्धा ऑल महाराष्ट्र वूशू असोसिएशन व ऑल नांदेड डिस्ट्रिक्ट असोसिएशन द्वारे यशवंत महाविद्यालय स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी सहभाग नोंदविला होता.
वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण, सहा रौप्य, सहा कास्य पदक प्राप्त करून महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्याला चौथे स्थान मिळवून खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव नावलौकिक केले.
![]()
या विजेते खेळाडू मध्ये कुमारी आश्लेषा वर्मा हिने एक सुवर्ण एक रौप्य पदक प्राप्त केले तर कु.दीप्ती मांदाडे सुवर्णपदक, कु.अश्विनी लोखंडे रौप्य पदक, कु. निकिता काळे कास्यपदक, कु. कल्याणी तितरे कास्यपदकाचे मानकरी ठरली तर तसेच पुरुष विभागांमध्ये प्रणव जिचकार रौप्य पदक, आकाश बहाले रौप्य पदक, रुपेश अवथळे रौप्य पदक, प्रीतम कालोकार दोन कास्यपदक, नेहाल भूते रौप्य पदक, प्रफुल भोयर कास्यपदक, सौरभ हिवरे कास्यपदक या खेळाडूंनी प्राप्त करून यशाचा तुरा रोवला.
या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक विशाल भगत, रुपेश गायकवाड, अभिषेक सोनवणे, वूशू स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. शिहान निलेश राऊत व त्यांचे प्रशिक्षक शिहान राजू एन.कांबळे सर ( क्रीडा शिक्षक तथा समुद्रपुर तालुका क्रीडा सह.संयोजक) आणि आई – वडिलांना यांना देतात.या संपूर्ण खेळाडूंच्या यशा बाबत वर्धा जिल्ह्यात सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


