राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर
वर्धा : नांदेड येथील यशवंत महाविद्यालय, बाबानगर, महात्मा फुले शाळे जवळ ऑल महाराष्ट्र वूशू असोसिएशन च्या मान्यतेने आयोजित 22 वी राज्यस्तरीय सिनियर महिला व पुरुष वूशू अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 7,8, व 9 जानेवारी 2025 ला यशस्वी रित्या पार पडली.
या स्पर्धेत वर्धेच्या खेळाडू सौ. कल्याणी मंगेश भोंगाडे यांनी आपल्या शानदार उत्कृष्ट वूशू आर्टचे प्रदर्शन करीत 2025 च्या 22 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य संपादन केले.
खेळाडू या यशाचे श्रेय गुरुवर्य शिहान मंगेश भोंगाडे यांना देते.या शानदार उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूचे स्पोर्ट विभागातून आणि सर्वच स्तरातून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


