![]()
दि. 3 जानेवारी 2025 रोजी स्त्री तारिणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त महिलांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड.प्रतिभा येलेकर यांनी स्त्रियांच्या कायद्या विषयी माहिती दिली. डॉ. सुषमा लीडर यांनी महिलांना होणारे आजार आणि त्याच्यावर उपाययोजना सुचवील्या तसेच सौ. वैशाली वनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनशैली वर प्रकाश टाकले.त्याच प्रमाणे ॲड. विणा बोरकर गाडगे यांनी स्त्रीयांच्या उपाय योजना आणि त्यावरील कायद्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अंजली मेश्राम, नीलिमा पाटील,संचिता शिंदे, शालिनी शेंडे, सुकेशनी वंजारी, सुरेखा कोगरे, रूपाली वाडई, आरती नागपूरकर, स्वाती नगराळे, अर्चना झाडे, रूपा निमेकर, पपीता तामगाडगे, ज्योती पडाल, उपस्थित होते.


