सुरेश भगत
शहर प्रतिनिधी
समुद्रपुर
आज हिंगणघाट येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी मानव धर्म उगम स्थान संस्थान द्वारा आयोजीत आई वारानसी जनजागरण संच भंडारा प्रस्तृत संगीतमय जनजागरण कार्यक्रम मनोहरराव सोंनकुसरे यांच्या मार्गदर्शनात आयोजीत करण्यात आला.
![]()
या संगीतमय जनजागरण कार्यक्रमाला उपस्थित होतो.गायक दिपक लाहोरी, गायक सुशील खांडेकर यांच्या मधुर आवाजाने मंत्रमुग्ध होत जनजागरण संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेतला.याप्रसंगी आयोजक समितीच्या वतीने अतुलभाऊ वांदिले यांचे स्वागत करण्यात आले. अतुल भाऊ यांनी केलेले स्वागत स्वीकारून आयोजक समितीचे आभार मानले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहाराध्यक्ष बालू वानखेडे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, नितीन भुते, गजू महाकाळकर, प्रविण भुते, अमोल मुडे, अनील भुते, आकाश हुरले, सुशिल घोडे आदी उपस्थित होते.


