Home Breaking News शहिद जवान अक्षय निकुरे यांच्या अंतिम संस्काराला उसळला जनसागर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार. 

शहिद जवान अक्षय निकुरे यांच्या अंतिम संस्काराला उसळला जनसागर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार. 

0
52

 

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट

दि 24 डिसेंबर ला जम्मू काश्मीर मधील पुंछ घाटी मध्ये भारतीय सैन्याची गाडी दरीत कोसळल्याने पाच जवान शहीद झाले होते तर पाच जवान जखमी झाले होते त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती येथील अक्षय निकुरे हा जवान त्यामध्ये सामील होता त्यात त्याला विरगती प्राप्त झाली .

अक्षय हा सन 2018 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाला होता,तो मराठा बटालियन चा सैनिक होता, त्यांच्या पाठोपाठ त्याचा लहान भाऊ सैन्यात भरती झाला आहे ते दोघे भाऊ देशासाठी कर्तव्य बजावत होते, कर्तव्य बजावत असताना अक्षय ला विरगती प्राप्त झाली,शहीद अक्षय निकुरेचे पार्थिव दिनांक 25 ला नागपूर येथे विमानाने आणण्यात आले नंतर दिनांक 26 ला सकाळी त्यांचे स्वगाव असलेल्या टेंमुर्डा जवळील पिंपळगाव येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते नंतर दुपारी बारा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या आज अंतिम संस्काराला परिसरातील व आजूबाजू गाव खेड्यातील नागरिकांनी एकच मोठी गर्दी जमली होती, शहीद अक्षय निकुरे यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले,

शहीद जवानाला आर्मी च्या जवानांनी रायफल्स च्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली, त्यांच्या अंत्यसंस्कार ला चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार श्रिमती प्रतिभाताई धानोरकर , सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्रा, तहसीलदार योगेश कौटकर, शिवसेना (उबाठा)जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे,व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या मागे वडील,आई, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here