Home Breaking News पूर्व प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली.

पूर्व प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली.

0
58

चंद्रपूर :- देशाचे पूर्व पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या पावन स्मृतिस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली.

 

जनसंपर्क कार्यालयात दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी श्रध्देय अटलजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करीत अहीर यांनी अटलजींनी देशाकरिता दिलेल्या भरीव योगदानाचे स्मरण केले. याप्रसंगी रघुवीर अहीर, राजु घरोटे, पुनम तिवारी, गौतम यादव, राहुल सूर्यवंशी व भाजप कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी श्रध्देय अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून त्याच्या स्मृतिस नमन केले व अटलजींच्या जयंतीदिनी देशभरात साजरा होणाऱ्या सुशासन दिनाच्या अहीर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here