राजु कांबळे
समुद्र्पुर तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर : विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गिरड च्या वतीने आज दिनांक ६ डिसेंबर २०२४ शुक्रवार शाळेच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य मान. श्री. एस. व्ही . तडस सर यांची अध्यक्षीय उपस्थिती लाभली, प्रमुख विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख मान. श्री. अशोकजी आडे सर, मंचकावर श्री. एच. डब्ल्यू.झाडे सर , श्री.यु व्ही वाणी सर, श्री. आर.एन. कांबळे सर, श्री. ए. पी. देवतळे सर, श्री. एस. एस. धुळे सर, श्री. आर. आर . गायकवाड सर, श्री. के. आर. बारोकर सर, ए.पी. तडस सर, कु. पी.बी.अग्निहोत्री मॅडम, ए .पी.तडस,श्री.बी.बी. पाल उपस्थित होते.
प्रतिमेच्या विधिवत पुजनानंतर.. कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात सहभागी मिडल, हायस्कूल विभागाचे विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनावर विस्तृत मनोगत व्यक्त केले, भीम गीताने आंबेडकरांची महती गायन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी व विचारपिठावर उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, पारिवारिक, शैक्षणिक, वैचारिक, अशा चौफेअर बाजूंनी विचार व्यक्त करत मनोगत मांडले.कार्यक्रमाचे संचालन कुमारी वैष्णवी सेलोरे ( १० अ ), कुमारी संजीवनी महले (७ अ ) यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता जयघोषाने झाली.


