Home Breaking News पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेस तृतीय क्रमांकाचे बक्षीस…! मुख्यमंत्री...

पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेस तृतीय क्रमांकाचे बक्षीस…! मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा.

0
68

 

 

चंद्रपूर २७ जुन – भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धेत पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेस चंद्रपूर जिल्ह्यातुन तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले असुन गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे यांच्या हस्ते मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित यांना एक लाख रूपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला.

भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यात राबविण्यात आले. या अभियानात राज्यातील हजारोच्या संख्येने शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये शासकीय आणि खासगी शाळांचाही समावेश होता. शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शासनाचा उद्देश होता. या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, महापालिका स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यात आले होते.

विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करुन शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. अभियानाचा हाच उद्देश लक्षात घेऊन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन शाळेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यात यश मिळविले आहे

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here