Home Breaking News मुनगंटीवारांच्या समर्थनात ओबीसी , आदिवासी, भटक्या विमुक्त जाती बांधवांचा मेळावा

मुनगंटीवारांच्या समर्थनात ओबीसी , आदिवासी, भटक्या विमुक्त जाती बांधवांचा मेळावा

0
60

 

चंद्रपूर:- राष्ट्रीय ओबीसी एसी एस टी क्रांतीदलाच्या वतीने उद्या दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी ठीक 11.00 वा .

चंद्रपूर येथील शकुंतला हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते क्रांतिदलाचे प्रदेश अध्यक्ष ऍड .राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्वात लोकसभा 2024 ची निवडणूक जिंकण्याचा संकल्प घेतील. यावेळी

प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती राहणार आहे.

ऍड.राजेंद्र महाडोळे यांना भाजपा ओबीसी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे.

ओबीसी समूहाचा संविधानिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आणि ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावण्याची घेतलेली हमी यामुळे ओबीसी समूहा चा विश्वास व भविष्यात ओबीसी साठी करावयाच्या कल्याणकारी योजना एवढेच नाही तर आदिवासी, विमुक्त भटक्या समाजासाठी करावयाच्या योजनांमध्ये सरकार कटिबद्ध असल्यामुळे समाजातील कार्यकर्त्यांनी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पाठीशी भरक्कमपणे उभे राहून विजयी करण्याचे निश्चित केलेले आहे. व त्यासाठी विविध जाती समूहातील नेते माधव कोहळे , राजेंद्र मांदाडे ,अमोल दादा गुरनुले,सौ रंजनाताई पारशिवे , राजाभाऊ बलूरवार,नंदू भाऊ नेहारे,आशिष गेडाम, लक्ष्मीकांत लोळगे, धर्माची आत्राम गणेशाथ्रम सुहास काळे उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here